नाशिक : पुढारी वृत्तसेवा– राज्यातील पहिले वातानुकुलित मेळा बसस्थानक उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बसस्थानकाचे शनिवारी (दि.१०) लोकार्पण होत आहे. (Nashik Mela Bus Stand)
ठक्कर बसस्थानकालगत 1.73 हेक्टर जागेमध्ये वसलेल्या या बस स्थानकात 6033.22 चौरस मीटर इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. नागरिकांना प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार असणाऱ्या या बस स्थानकात तळघरात प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या बस स्थानकात 20 फलाट असून यापैकी 4 फलाट वातानुकूलित करण्यात आलेले आहे. नाशिकमध्ये होणारे या बसस्थानकात चालक व वाहक महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र विश्रामगृह तयार करण्यात आले आहे. मातांना आपल्या लहान बाळाची काळजी घेता यावी, यासाठी स्वतंत्र हिरकणी कक्ष तयार करण्यात आला आहे. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह देखील तयार करण्यात आले आहे. या बस स्थानकात अपंगांना प्रवेश करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेले असून, अपंगांसाठी स्वतंत्र प्रसाधाण गृह देखील तयार करण्यात आले आहे. बस स्थानकाच्या संपूर्ण परिसराचे ट्रिमिक्स काँक्रीटीकरण करण्यात आलेले आहे. (Nashik Mela Bus Stand)
बस स्थानकात स्वतंत्र वाहतूक नियंत्रण कक्ष, नागरिकांना अल्पोपहार करता यावा यासाठी उपहारगृह, स्वतंत्र पार्सल, सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकी तयार करण्यात आली आहे. या अत्याधुनिक बस स्थानकामुळे नाशिकच्या लौकिकात वाढ होईल, असा दावा नाशिक मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केला आहे.
हेही वाचा :
- Bharat Ratna | माजी पंतप्रधान चरण सिंह, पीव्ही नरसिंह राव यांच्यासह एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न
- गडचिरोली : शिवराजपूर जंगलात फिरत असलेल्या जखमी वाघाला वनाधिकाऱ्यांनी केले जेरबंद
- Pakistan election results 2024 | पाकिस्तान निवडणूक- नवाझ शरीफ यांनी लाहोर जिंकले, इम्रान खान यांच्या समर्थकांचा पराभव
The post राज्यातील पहिले एसी बस स्थानक नाशिक शहरात, उद्या उद्घाटन appeared first on पुढारी.