रिल्स, स्टेटस आणि ट्रोलिंग; विविध पक्षांचे वॉर रूम तयार

सोशल मिडीया प्रचार pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशात लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच काही अपवाद सोडता मतदारसंघनिहाय प्रचार सुरू करण्यात आलेला आहे. यामध्ये विविध पक्षांनी आपले वॉर रूम तयार करत सोशल मीडियावर रिल्स, व्हिडिओ स्टेटस आणि ट्रोलिंगसाठीचा कंटेंट तयार करायला सुरुवात केली आहे. यासाठी स्वतंत्र संस्थांचीदेखील मदत घेतली जात आहे.

यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत तरुण मतदार सर्वाधिक आहेत. यामध्ये वय २५ ते ३९ दरम्यानचे यंगस्टर्सचा समावेश आहे. या नवमतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाइतके प्रभावी माध्यम नसल्याचे पक्षांच्या धुरिणांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट, रील्स, मीम्स व्हायरल करण्याच्या जेवढ्या संधी असतील तेवढ्या करण्याच्या प्रयत्नात पक्षाचे पदाधिकारी आहेत. यासाठी विशेष कक्ष, वॉर रूमदेखील तयार करण्यात आला आहे.

पक्षांच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी बनविलेल्या विशेष सोशल मीडिया विंगचा फायदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. मीम्स, ट्रोलिंग पोस्ट, रील्स तयार झाल्यानंतर ट्विटर, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम यांवर लवकरात लवकर व्हायरल करण्याची जबाबदारी या विंगवर देण्यात येत आहे. त्यामुळे मतदारांवर प्रचाराचा भडीमार या माध्यमातून केला जात आहे.  सोशल मीडियावर यंदा देशातील दोन प्रमुख पक्षांमध्येदेखील वॉर बघायला मिळत आहे. काँग्रेसने केलेल्या ‘हात बदलेगा हालात’ आणि भारतीय जनता पक्षाच्या ‘मोदी मॅजिक’ या शीर्षकाखाली येत असलेल्या पोस्ट, व्हिडिओ यांचा समावेश आहे.

हेही वाचा:

The post रिल्स, स्टेटस आणि ट्रोलिंग; विविध पक्षांचे वॉर रूम तयार appeared first on पुढारी.