लंके समर्थकांकडून “राज तिलक की, तयारी करो” चे बॅनर

सिडको, नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीचे मतमोजणी ४८ तासावर आलेली असताना महाविकास आघाडीचे (अहिल्यानगर) दक्षिणचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकांकडून नाशिक पश्चिम मतदार संघातील सिडको येथील त्रिमूर्ती चौक, लेखानगर, पाथर्डी फाटा शुभम पार्क, उत्तमनगर, पवननगर यासह विविध भागात ठिकठिकाणी जोरदार बॅनरबाजी करण्यात आलेली दिसून येत आहे.

पवननगर या भागात “राज तिलक की तयारी करो” या स्लोगनसह लावण्यात आलेले बॅनर

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच समर्थकांनी निलेश लंके यांचाच विजय निश्चित असल्याबाबतचे बॅनर्स लावून लंके यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या बॅनर्सवर “अपराजित संघर्ष योद्धा” जनता जनार्दन माझ्या पाठीशी, मग काय कुणाची भीती, “राज तिलक की तयारी करो” असे स्लोगन या बॅनर्सवर टाकण्यात आले आहे. एकीकडे अहिल्यानगर मध्ये सुजय विखे व निलेश लंके असा कट्टर सामना रंगणार असला तरीही समर्थकांना निलेश लंके हेच निवडून येणार असल्याने नाशिक मध्ये निकालापूर्वीच त्यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे नाशिक शहरासह सिडको परिसरात चर्चेला उधाण आले आहे. या बॅनरबाजीची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: