‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये महिलेवर अत्याचार, बलात्काराची फिर्याद दाखल

अत्याचार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत असताना एकाने महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आडगाव पोलिस ठाण्यात संशयित आमोद बुद्धीसागर (४०) याच्या विरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार ती, नांदूर नाका भागात राहते. तिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला असून दाेन लहान अपत्ये आहेत. दाेन वर्षांपूर्वी पीडितेचा पती साेडून गेल्याने ती दोन्ही मुलांसह एकटी राहत होती. त्यानंतर तिची ओळख संशयित बुद्धीसागर याच्यासोबत झाली. १ ऑगस्ट २०२२ ते २० एप्रिल २०२४ या कालावधीत दाेघे लिव्ह इनरिलेशनशिपमध्ये राहिले. साेबत राहत असतांना बुध्दीसागर याने पीडितेवर नांदूरनाका व त्रिमूर्ती चाैक भागातील घरांत अत्याचार केले. दरम्यान, दोघांमध्ये वाद झाल्याने त्याने पीडितेस तिच्या कुटूंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने आडगाव पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

हेही वाचा –