लोकसभा रणसंग्राम 2024 | चुरशीची लढत; उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

ईव्हीएमची ‘ही’ त्रुटी दूर होईल का?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – अवघ्या राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक, दिंडाेरी व धुळे मतदारसंघांसाठी सोमवारी (दि.२०) मतदान झाले. नाशिकचा पारा ४०.५ अंशांवर असतानाही मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. मतदानादरम्यान नाशिकमध्ये आजी-माजी आमदारांमध्ये बाचाबाची झाली. ग्रामीण भागात कांद्याच्या माळा घालून शेतकरी केंद्रांवर पोहोचले. नाशिकमध्ये सरासरी ६१, दिंडोरीत ६७, तर धुळ्यात 49 टक्के मतदान झाले. २०१९ च्या तुलेनत यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला आहे. वाढीव मतदान कोणाच्या पथ्यावर पडते हे चार जूनला निकालातूनच स्पष्ट होईल.

अठराव्या लोकसभेसाठी राज्यातील पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात १३ जागांवर मतदान झाले. उन्हाचा तडाखा व सलग तीन दिवसांच्या सुट्यांमुळे मतदानाचा टक्का घसरेल, असा अंदाज बांधला जात होता. परंतु, नाशिककरांनी मतदान केंद्रांवर गर्दी करत हा अंदाज फोल ठरविला. शहरातील बहुतांश केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. ज्येष्ठ नागरिकांचाही उत्साह वाखाणण्याजोगा होता. नाशिक मतदारसंघात सायंकाळी पाचपर्यंत ५१.१६ टक्के मतदारांनी हक्क बजावला. तर सायंकाळी सहाला मतदान संपुष्टात आल्यानंतरही शहरात विविध मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. प्रशासनाने रात्री ९ पर्यंत दिलेल्या अंदाजानुसार मतदारसंघात ६१ टक्के मतदान झाले असून, त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. धुळे मतदारसंघातही मतदान वाढण्याची शक्यता आहे.

दिंडोरी मतदारसंघात उत्साह पाहायला मिळाला. सहाही विधानसभा मतदार क्षेत्रात मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. दुपारी २ ते ४ यावेळेत उन्हाचा तडाखा अधिक असल्याने मतदानाचा जोर काहीसा मंदावला होता. मात्र सुरगाणा, पेठ, दिंडाेरी, चांदवड आदी भागांमध्ये चार नंतर मतदान केंद्रांवर गर्दी वाढली होती. दिंडोरीत पाचपर्यंत ५७.०६ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. मतदान केंद्रांवरील सायंकाळच्या रांगा बघता सरासरी ६७ टक्क्यांपर्यंत ते पोहोचले अशी शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात आली आहे.

मतदान पार पडल्यानंतर आता साऱ्यांच्याच नजरा ४ जून रोजीच्या मतमोजणीकडे लागल्या आहेत. अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी पार पडणार आहे. २०१९ च्या तुलनेत दोन्ही मतदारसंघांत यंदा मतदानाच्या टक्क्यात चांगली वाढ झाली आहे. प्रशासनाने घेतलेल्या मेहनतीमुळे हे शक्य झाले आहे. वाढीव मतदान आता काेणाला तारणार व कोणासाठी मारक ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट हाेईल.

  • बोगस मतदानाचा महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांचा आरोप
  • शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आल्याने गोंधळ
  • सिडकोत राजाभाऊ वाजेंविरोधात भाजपची घोषणाबाजी
  • माजी आ. दीपिका चव्हाण कांद्याच्या माळा घालून केंद्रावर
  • माजी नगरसेवक प्रशांत दिवे पोलिसांच्या ताब्यात
  • नाशिक शहरातील चारही मतदारसंघ मिळून ५८.५ टक्के मतदान
  • सिन्नर व इगतपुरीत मतदानाचा टक्का वाढला

सिन्नरमध्ये सर्वाधिक मतदान

नाशिक लाेकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघाअंतर्गत मतदानासाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. मतदारसंघात सिन्नर तालुक्यात सर्वाधिक ६८ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. त्याखालाेखाल इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमध्ये ६६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. देवळालीत ६१, नाशिक पश्चिममध्ये ६०, नाशिक मध्य ५७, तर नाशिक पूर्व सर्वात कमी ५७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली.

दिंडोरी मतदारसंघ सायंकाळी पाचपर्यंत मतदान टक्केवारी
मतदारसंघ…. ७ ते ९…… ७ ते ११….. ७ ते १….. ७ ते ३…. ७ ते ५….
नांदगाव……. ६.५१…….. १८.६८….. ३२.०४…… ४१.८८…..५२.०८….
कळवण….. ३.०५……… १९.२५…… ३५.४५……. ५३.८४…..६२.२८….
चांदवड….. ८.०८…….. २०.८८…….. ३५.०५…… ४७.५७…..५९.१५…..
येवला…… ६.०४……… २०.०२…….. ३२.०८….. ४०.६७……..५०.३३….
निफाड…. ६.०१…….. २०.०१…… ३१.६१……. ४४.३७………५७.१….
दिंडोरी…. ७.०५…….. १८.०९…… ३३.०१……… ४८.०२…….६२.०३….

नाशिक लोकसभा मतदारसंघ तासनिहाय मतदानाची टक्केवारी –
मतदारसंघ….. ७ ते ९……. ७ ते ११…….. ७ ते १……. ७ ते ३……… ७ ते ५…….. ५ नंतरचे मतदान सिन्नर…… ७.०७………. २०.१६…….. ३३.००…….. ४५.०३…….५८.७….68
नाशिक-पूर्व… ६.४८……. १६.८१……… २६.७२……. ३८.१२……..४९.२३….56
नाशिक- मध्य…. ७.१२….. ११.१५……. २९.७६…….. ४०.२१…..५१.०१….57
नाशिक-पश्चिम…. ६.२८……. १६.२४…….. २४.७२…. ३२.२८……४५.०८…60
देवळाली……. ५.०३……… १६.०५……… २८.३०…….. ४०.०२…….४९.८….61
इगतपुरी-त्र्यंबक….. ५.६८…….. १७.३३……… ३१.०७………

हेही वाचा: