‘वंचित’कडून दिंडोरीपाठोपाठ जळगावमधील उमेदवार बदलला

वंचित उमेदवार pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वंचित बहुजन आघाडीने नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाकडून सोमवारी (दि.२२) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडणुकीतील वंचितच्या एन्ट्रींमुळे नाशिकमध्ये महायुती, महाविकास आघाडी तसेच वंचित असा तिहेरी सामना रंगणार असल्याचे दिसत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. येत्या शुक्रवार (दि.२६)पासून उमेदवारी अर्ज दाखल करायची प्रक्रिया सुरू होत आहे. नाशिकच्या जागेवर महाविकास आघाडीने उमेदवाराची घोषणा करत आघाडी घेतली आहे. तर महायुतीमध्ये उमेदवारीवरून अद्यापही वाद कायम आहे. अशा परिस्थितीत वंचित निवडणुकीच्या रिंगणात कोणाला उतरविणार यावरून सस्पेंन्स कायम होता.

महाविकास आघाडीशी जागा वाटप फिस्कटल्यानंतर वंचितने राज्यात स्वतंत्र चूल मांडली आहे. त्यानुसार आठवड्याभरापूर्वी दिंडाेरीतून गुलाब बर्डे यांच्या नावाची घोषणा पक्षाने केली होती. मात्र, वंचितकडून रविवारी (दि.२१) गुलाब बर्डे यांचा पत्ता कट करून मालती थविल यांना तिकीट देण्यात आले. एकीकडे दिंडोरीत उमेदवार बदलत वंचितने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला असतानाच नाशिकच्या जागेसंदर्भात निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे राजकीय क्षेत्रात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या. अखेर वंचितने गायकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने नाशिकची लढत रंगतदार होणार आहे.

जळगावमध्ये जाधव
वंचित बहुजन आघाडीने दिंडोरीपाठोपाठ जळगावमधील उमेदवार बदलला आहे. जळगावमधून युवराज जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ‘वंचित’ने यापूर्वी प्रफुल्लकुमार लोढा यांना तिकिट दिले होते. लोढा यांची कधीकाळी ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख होती. पण वंचितने त्यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होता. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या तीन दिवसांची अंतिम मुदत शिल्लक असताना ‘वंचित’ने लोढा यांचा पत्ता कट करून जाधव यांना तिकीट दिल्याने उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा: