वडाळी नजीकच्या बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे उघड

Murder,www.pudhari.news

पिंपळगाव बसवंत(जि. नाशिक) :  तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रोशन ज्ञानेश्वर झालटे याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत साकोरे मिग शिवारात एका विहरीत आढळून आला आहे. तो बेपत्ता नव्हता तर त्याचा खून झाल्याचे उघड झाले आहे.

याबाबत पिंपळगाव पोलिसांनी तात्काळ सूत्रे फिरवत संशयित आरोपी हृषीकेश घुमरे, (रा. उंबरखेड) व  ओमकार डेर्ले (उंबरखेडरोड पिंपळगाव बसवंत) या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली आहे. रात्री उशिरा पिंपळगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी, निफाड तालुक्यातील वडाळी नजीक येथील युवक रोशन ज्ञानेश्वर झालटे हा मंगळवार दि.(१७) सकाळपासून घरून कामानिमित्त गेला तसा अद्यापही परतला नव्हता. पिंपळगाव पोलीस स्टेशनमध्ये तो बेपत्ता असल्याबाबत तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. मात्र गुरुवार दि.(२०)रोजी त्याचा मृतदेह साकोरे मिग शिवारातील एका विहरीत संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने त्याची आत्महत्या नव्हे तर त्याचा खूनच झाल्याचा प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शी परिस्थिवरून पोलीस तपासात उघडकीस झाल्याने वडाळी नजीक गाव खुनाच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

पिंपळगाव पोलिसांनी तात्काळ सूत्रे फिरवीत संशियत आरोपी हृषीकेश घुमरे व ओमकार डेर्ले यास अटक केली.  त्यांनी रोशन ज्ञानेश्वर झालटे याच्या डोक्यात पावडे मारून मृतदेहास दगड बांधून साकोरे मिग शिवारातील विहिरीत फेकल्याची कबुली दिली आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील भामरे यांनी खुनेच्या घटनेचा आढावा घेतला. पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक पवार अधिक तपास करत आहे.

हेही वाचा :

The post वडाळी नजीकच्या बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे उघड appeared first on पुढारी.