वणी -नाशिक रस्त्यावर भीषण अपघात, दोन पोलीस कर्मचारी ठार

अपघात वणी

 वणी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- वणी – नाशिक रस्त्यावरील ओझरखेड शिवारातील हॉटेल श्रीहरी जवळील वळणावर प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी जीप व हुंडाई व्हरना कार यांची धडक होवून पाठीमागून दिलेल्या धडकेत कार मधील नाशिक शहर पोलिस कर्मचारी व महिला पोलिस दोघे ठार झाले.

मंगळवारी ता. २३ रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या दरम्यान प्रवाशी वाहतुक काळी पिवळी जीप क्रमांक (एम एच १५ ई २१३२) ही नाशिक बाजूने वणीकडे वेगात येत असतांना समोरुन भरधाव वेगाने येणारी हुंडाई व्हरना क्रमाक (एम एच १५ डी एम ९१८३) यांच्या समोरील बाजूस धडक झाली. यात व्हरना कार मधील ज्ञानेश्वर एन. रोंदळ, वय ५२, रा. नाशिक पोलिस मुख्यालय व रेणूका भिकाजी कदम (महिला पोलिस) हे गंभीर जखमी होवून जागीच ठार झाले. मृतांना वणी येथील ग्रामिण दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. सोनाली गायधनी यांनी तपासून मृत घोषीत केले. सप्तशृंगी गडावरुन चैत्रोत्सवाचा बंदोबस्त संपल्यानंतर घरी जात परतांना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहीती आहे. वणी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवाशी वाहतुक करणारी काळीपिवळी जीपचा चालक अरूण रामचंद्र गायकवाड, राहणार- ओझरखेड ता. दिंडोरी जि.नाशिक याxच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

अपघातग्रस्त काळी पिवळी जीप

हेही वाचा