वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्या जागेवर मृत झाला

मृत बिबट्या pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुंबई-आग्रा महामार्गावर कोकणगावजवळ शनिवारी (दि. १६ ) रात्री साडेदहाच्या सुमारात वाहनाच्या धडकेने नर बिबट्याचा मृत्यू झाला.

वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्याचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन पोटाच्या जागेला गंभीर दुखापत झाल्याने बिबट्या जागेवरच मृत झाला. महामार्गावर पेरूच्या बागेसमोर वाहनाने धडक दिल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. याबाबत माहिती मिळताच वन्यजीवरक्षक पिंटू पवार यांनी तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावून या सहावर्षीय नर बिबट्यास तेथून नेत महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर केली. मृत बिबट्यास शिरवाडे वणी येथील वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. अपघाताच्या घटनेबाबत पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. वनविभागाने चांदवड येथे बिबट्याचे शवविच्छेदन करून वनविभाग कार्यक्षेत्रात अंत्यविधी केला. वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे, वनपाल प्रकाश सोमवंशी, वनरक्षक विजय टेकनर, वनसेवक वसंत देवरे, अशोक शिंदे, भरत वाघ उपस्थित होते.

हेही वाचा:

The post वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे बिबट्या जागेवर मृत झाला appeared first on पुढारी.