वैर मिटला; दिंडोरी लोकसभा मतदारसंघात परिवाराचे मनोमिलन

दिंडोरी www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
निवडणूक म्हटली की त्यामध्ये राजकारण, घराणेशाही आणि नातीगोती विचारात घेतली जातात. नुकतेच सुप्रियांनी दादांच्या घरी जात आशाकाकीची भेट घेतली तर त्याची लगेच चर्चा झाली. राजकारणातील अशा नात्यांच्या लढती नेहमीच चर्चा केली जाते. नणंद -भावजयच्या या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले. असाच नात्यागोत्यांची चर्चा नाशिकमध्ये सुद्धा झाली. ती म्हणजे दिर-भावजय यांच्यातील मनभेद संपल्याची आल्याची चर्चा होत आहे.  भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी गटातील हा संघर्ष होता. शेवटी हा संघर्ष आता मिटल्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष  मिटला आहे.  खासदार डॉ. भारती पवार यांनी आमदार नितीन पवार यांची प्रत्यक्षपणे भेट घेतली आहे.

आमच्यात मतभेद असले तरी आता कोणतेही मनभेद उरले नसल्याचे डॉ. भारती पवार यांनी सांगितले आहे. आमच्या परिवाराचे मनोमिलन झाले असून मोठ्या मनाने जेट यांनी लहान बहिणीला आशीर्वाद द्यावा असे डॉ. पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

कळवण मतदार संघाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार नितीन पवार आणि भाजप खासदार अन् दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉ.  भारती पवार हे सख्ख्ये दीर-भावजय आहेत. डॉ.  भारती पवार आणि नितीन पवार यांच्यातील राजकीय वैर असल्याच्या चर्चा होत होत्या. मतदार संघातील वर्चस्वावरुन संघर्ष होत होता. परंतु आता दिंडोरीच्या उमेदवार डॉ.  भारती पवार यांनी कळवणचे आमदार नितीन पवार यांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर भारती पवार नितीन पवार यांच्या या भेटीला महत्त्व प्राप्त झाले असून आता प्रचारातही रंगत येणार आहे.

नितीन पवार आणि भारती पवार यांच्यातील वैर संपुष्टात आल्याने राजकीय संघर्ष आता वळण घेणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात या वादाचे पर्यवसन झाल्याने त्याचे सकारात्मक परिणाम डॉ. भारती पवार यांना होणार आहेत. त्यामुळे २० मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी डॉ. पवार यांना त्याचा लाभच होण्याची शक्यता दिसून येत आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात महायुतीकडून उमेदवार डॉ. भारती पवार तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार भास्कर भगरे हे निवडणुकीच्या लोकसभा रणसंग्रम लढत आहेत.

हेही वाचा: