सकाळी ९ पर्यंत नाशिक 6.38 तर दिंडोरी 6.3 टक्के मतदान

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात ४९ जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज आहे. महाराष्ट्रात सकाळी 9 पर्यंत 6.33 टक्के मतदान झाले आहे. तर जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघातून 6.3 टक्के मतदान तर नाशिक मतदारसंघातून 6.38 टक्के मतदान झाले आहे.

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बजावला मतदानाचा हक्क

आमदार सिमा हिरे यांनी बजावला मतदानाचा हक्क

दिंडोरी तालुक्यात उत्साहाने मतदानाला सुरुवात जानोरी येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा. (छाया : समाधान पाटील)

मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग
जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी मतदारसंघांत भयमुक्त व शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सुसज्ज झाले आहे. नाशिक मतदारसंघातील ९५५, तर दिंडोरीमधील ९६१ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग केले जाणार आहे. दाेन्ही मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनामध्ये मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग केले जाईल. या माध्यमातून केंद्रांवर वॉच ठेवण्यात येईल.

शहरात मतदारांनी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा लावल्या आहेत.

केंद्रांवरील सुविधा
जिल्हा प्रशासनामार्फत मतदानावेळी केंद्रावर विविध सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या सुविधांमध्ये वॉटरप्रूफ मंडप, आरोग्य विभागाचे पथक व प्रथमोपचार पेटी तसेच औषधे, मतदारांना बसण्यासाठीची सुविधा, पाळणाघर, पिण्याचे पाणी आदी बाबींचा समावेश त्यात असेल. याशिवाय जिल्ह्यातील दोन हजार ३१७ ठिकाणी व्हीलचेअरची तसेच ६२२ मतदारांना वाहतूक सुविधा दिली जात आहे.