
सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर बुधवारी (दि.19) मध्यरात्री एकच्या सुमारास स्विफ्ट कारचा भीषण अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना घडली. सिन्नर तालुक्यातील म-हळ-फुले नगर शिवारात हा अपघात झाला.
महामार्ग पोलीस केंद्र सिन्नर हद्दीतील समृध्दी महामार्गावर किमी ५६१.५ नागपुर लेनवर नाशिक बाजू कडून शिर्डी बाजूकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार क्र.MH-14 EY-7198 हिचेवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दोन्ही रस्त्यांच्या मध्ये असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळल्याने अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
या भीषण अपघातात चालक हर्षल भोसले व श्रीकांत थोरात रा. जि. अहमदनगर हे दोघे जागीच मयत झाले असून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, सिन्नर येथे पाठविण्यात आले आहेत. अपघातग्रस्त वाहन मुख्य रस्त्यावरून बाजूला असल्याने वाहतुकीत कुठलाही कोळंबा आला नाही. वावी पोलीस अपघाताचा अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा :
- दोषींना माफी नाही : मणिपूरमधील घटनेवर पंतप्रधान मोदींची स्पष्टोक्ती
- बिबट्यांची नसबंदी होणार ; वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश
- नाशिक : ठेकेदारांचे आंदोलन तिसऱ्या दिवशी स्थगित
The post समृद्धीवर स्विफ्ट कारचा भीषण अपघात, दोघे जागीच ठार appeared first on पुढारी.