साखरपुडा पडला आठ लाखांना, देवळालीत दिवसा घरफोडी

देवळाली घरफोडी www.pudhari.news

देवळाली कॅम्प, पुढारी वृत्तसेवा : येथील विजय नगरच्या दत्त पेट्रोल पंपाजवळ राहणाऱ्या मयूर अरुण शेटे यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने सोन्याचांदीच्या दागिने व साडेचार लाख रुपये रोख रक्कम अशी सुमारे ८ लाख ३८ हजार रु. चा मुद्देमाल चोरला आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसात भादंवि ४५४, ४५७ व ३८० या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घरफोडी प्रकरणात येथील पान सुपारीचे व्यापारी मयूर शेटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आपण घरातील अन्य सदस्यांसह शुक्रवार (दि. २९) दिवसभर साखरपुड्यासाठी गेलो होतो. दिवसभर घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. लॉक असलेल्या देव घरातील लोखंडी कपाटातून व बेडरूममधील लाकडी कपाटातून रोख रक्कम ४ लाख ५० हजार, ८ हजार रु. किमतीची सोन्याची नथ, २ लाख ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पट्टी पोत पँडलसह, ५० हजार रु. किमतीचे मणी मंगळसूत्र, १२ हजार रु. किमतीचे सोन्याचे टॉप्स, २० हजार रु. सोन्याचा वेढा, १२ हजार रु. किमतीचे चांदीचे कॉईन, २ हजार रु. चांदीचा दिवा व ५ हजार रु.किमतीचे चांदीचे छल्ले, ४ हजार रु.किमतीचे चांदीचे ५ जोडवे व ५०० रु.च्या ५० नोटा असा ८ लाख ३८ हजार १०० रु. ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

पाळत ठेवून घरफोडी

चोरीची खबर लागताच देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. डॉग स्कॉड व ठसे तज्ञांनाही बोलवण्यात आले. याप्रकरणी परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले जात आहेत. दरम्यान
पाळत ठेवून घरफोडी करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे .

गजबजलेला परिसर
अतिशय गजबजलेल्या परिसरात अशा प्रकारची झालेली घरफोडी धक्कादायक आहे, पोलिसांचे फिरती पथक रात्री बरोबर दिवसाही परिसरात फिरले पाहिजे.
-तानाजी भोर, वृक्षमित्र

हेही वाचा :

The post साखरपुडा पडला आठ लाखांना, देवळालीत दिवसा घरफोडी appeared first on पुढारी.