हेमंत गोडसेंना मागे टाकत राजाभाऊंचाच आवाज दुमदुमला

वाजे गोडसे www.pudhari.news

Nashik Lok Sabha Election Results 2024 : नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी मोठी आघाडी घेत 30 हजार मतांन आघाडी घैतली आहे. महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे हे पिछाडीवर आहेत.

आज मंगळवार (दि.४) रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी आघाडी घेतलेली आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे तर महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे तर अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यात प्रमुख लढत होत आहे. राजाभाऊ वाजे यांना पहिल्या फेरी अखेरीस 10752 मतांची आघाडी घेतली होती.

नाशिकमधून राजाभाऊ वाजे आघाडीवर

दुसऱ्या फेरी अखेर राजाभाऊ वाजे यांनी तब्बल 19 हजर 700 मतांनी आघाडी घेतलेली आहे. तर तिसऱ्या फेरीअखेर राजाभाऊ वाजे यांनी तब्बल 30 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. तसेच राजाभाऊ वाजे यांच्या नावाचे नाशिकमध्ये फलक देखील झळकायला सुरुवात झालेली आहे.

दिंडोरीतून भास्कर भगरे आघाडीवर

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी संपली असून फेर मतमोजणीनंतर आलेल्या आकडेवारीत महाविकास आघाडीचे भास्कर भगरे 1435 मतांनी आघाडीवर आहेत.

तिसऱ्या फेरी अखेर नाशिक मधून राजाभाऊ वाजे 30599 मतांनी आघाडीवर
चौथ्या फेरी अखेर नाशिक मधून राजाभाऊ वाजे 36438 मतांनी आघाडीवर

चौथ्या फेरीत दिंडोरीमधून भगरे 6189 आघाडीवर होते
भगरे 94184
पवार 87195

पाचवी फेरी दिंडोरीमधून भगरे 15540 मतांनी आघाडीवर

भास्कर भगरे 143942
डॅ. भारती पवार 128402

महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभा उमेदवार राजाभाऊ वाजे यांना लिड मिळत असल्याने उबाठा शिवसेना तर्फे सिडकोतील उत्तमनगर भागात जल्लोश साजरा करताना शिवसैनिक. (छाया : राजेंद्र शेळके)