अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इयत्ता दहावीच्या निकालानंतर नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रक्रिया राबविली जात आहे. त्या अंतर्गत बुधवारी (दि. ३) पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. तोपर्यंत कोटाअंतर्गत प्रवेश निश्चितीवर विद्यार्थ्यांना भर द्यावा लागणार आहे.

राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांमधील कनिष्ठ महाविद्यालयांच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी https://11thadmission.org.in/ अधिकृत संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. ‘फेरी क्रमांक एक’ या फेरीतील विद्यार्थ्यांची निवड यादी १९ जूनला प्रसिद्ध होणार आहे. यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २२ जूनपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागेल, तर २३ जूननंतर दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू होणार आहे.

दरम्यान, राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून कोटांतर्गत दिल्या जाणाऱ्या प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुरुवार (दि. ८) पासून व्यवस्थापन कोटा, इनहाऊस कोटा आणि अल्पसंख्याक कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय प्रवेशासाठीसुद्धा प्रवेश अर्जातील दुसरा भाग भरणे गरजेचे आहे. विद्यालयांना दि. १३ ते १५ जून या कालावधीत कोटा अंतर्गत प्रवेश निश्चित करावे लागतील. तसेच दि. १६ ते १८ जून या कालावधीत कोटानिहाय रिक्त राहिलेल्या जागा प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर विद्यार्थी रिक्त जागांवर विद्यार्थी पुन्हा पसंतीक्रम नोंदवू शकणार आहे.

प्रवेशाची स्थिती

महाविद्यालये : ६३

जागा : २६,४८०

नोंदणी : ८,७९२

लॉक अर्ज : ५,३५८

पडताळणी : १,

हेही वाचा : 

The post अकरावीची पहिली गुणवत्ता यादी १९ जूनला appeared first on पुढारी.