कांदा निर्यात बंदीविरोधात शरद पवार मैदानात, रास्तारोकोत सहभागी

शरद पवार नाशिक www.pudhari.news

चांदवड(जि. नाशिक) : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांवर एक प्रकारे मोठा अन्याय केला आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे हेरून केंद्र सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार शरदचंद्र पवार स्वतः मैदानात उतरले आहे. यासाठी नाशिकच्या चांदवड मध्ये ते दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत चांदवड चौफुलीवर रास्तारोको करण्यात येतो आहे.

राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना शेतकऱ्यांनी पिकविलेला कांदा, द्राक्ष, ऊस पिकांना बाजारभाव नाही आहे. तसेच अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे. अशा गंभीर परिस्थितीत मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून दिलासा देणे आवश्यक होते. मात्र केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल तयार करणे बंद केले तसेच कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. केंद्र सरकारच्या या दोन्ही निर्णयाविरोधात आवाज उठवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे खासदार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन करण्यात येतो आहे.

 

The post कांदा निर्यात बंदीविरोधात शरद पवार मैदानात, रास्तारोकोत सहभागी appeared first on पुढारी.