कोथिंबीरीचा आठवड्यात भाव १० हजारांवर; शेतकऱ्यांत समाधानाची भावना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत चालू आठवड्यात कोथिंबीरने १० हजाराचा पल्ला ओलांडला. त्यामुळे बळीराजाने पिकविलेल्या कोथिंबीरीला चांगले दिवस आल्याची भावना शेतकरी वर्गामध्ये आहे. या आठवड्यात कोथिंबीरीची सरासरी आवक ४२५ ते ५०० क्विंटल आहे. किमान दर हा तीन ते पाच हजार एवढा होता. तर कमाल दर प्रतिक्विंटल साडेदहा हजार ते ११ हजार पर्यंत पोहोचला असून, सर्वसाधारण दर हा साडेसात हजार ते आठ हजार या दरम्यान स्थिरावला.

मान्सूनच्या सुरुवातीला कोथिंबीरीचे भाव वाढल्याने सर्वसामान्य जरी त्रस्त असले तरी शेतकरी आणि व्यापारीवर्गात आनंद दिसून येत आहे. जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात कोथिंबीरच्या दरात फारसे चढ-उतार जाणवले नसले तरीही बाजारात चर्चा कोथिंबीरीचीच होती. सोमवारी (दि. १९) आवक झालेल्या कोथिंबिरीला पाच ते १० हजार असा प्रतिशेकडा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७, ५०० रुपये प्रतिशेकडा असा होता. मंगळवारी (दि.२०) तीन ते १० हजार असा दर प्रतिशेकडा मिळाला. सर्वसाधारण दर ७,००० रुपये प्रतिशेकडा असा होता. बुधवारी (दि. २१) तीन ते ११ हजार २०० असा प्रतिशेकडा दर मिळाला. सर्वसाधारण दर ६,५०० रुपये प्रतिशेकडा असा होता. गुरुवार (दि. २२) ३,००० ते १० हजार असा दर मिळाला. सर्वसाधारण दर रुपये ७,६५० होता. शुक्रवारी (दि. २३) हा दर ३,००० ते १० हजार ६०० रुपयांपर्यंत गेला. सर्वसाधारण दर रुपये ७,४०० प्रतिशेकडा असा होता.

हेही वाचा:

The post कोथिंबीरीचा आठवड्यात भाव १० हजारांवर; शेतकऱ्यांत समाधानाची भावना appeared first on पुढारी.