खंडणी घेणाऱ्या मायलेकासह तिघांना जामीन

खंडणी प्रकरण नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आक्षेपार्ह व्हिडीओ दाखवून धमकावत दहा लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कृषी सहायक महिला अधिकाऱ्यासह तिचा मुलगा व भावास न्यायालयाने जामीन मंजूर केला. सारिका बापूराव साेनवणे (४२), माेहित बापूराव साेनवणे (२५, दोघे रा. नाशिक), विनोद सयाजी चव्हाण (४४, रा. देवळा) अशी जामीन मंजूर झालेल्या संशयितांची नावे आहेत.

निंबा शिरसाठ यांच्या फिर्यादीनुसार, संशयित मायलेकांनी त्यांना आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून १० लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. गंगापूर पोलीस व खंडणीविरोधी खंडणी घेताना संशयितांना रंगेहाथ पकडले. सुरुवातीस दोघांना अटक केली होती. तर संशयितेचा भाऊ विनोद याचाही सहभाग निष्पन्न झाल्याने त्यालाही अटक केली होती. तिघांच्या जामीन अर्जांवर बुधवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांच्यासमोर सुनावणी झाली. तिघांना अटी-शर्थीच्या अधिन राहून जामीन मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post खंडणी घेणाऱ्या मायलेकासह तिघांना जामीन appeared first on पुढारी.