चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदी पात्रात कोसळली

नंदिनी नदी पात्रात कोसळली कार,www.pudhari.news

नाशिक सातपूर : पुढारी वृत्तसेवा; सातपुर परिसरातील नंदिनी नदी पात्रात चालकाचे गाडी वरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन नदी पात्रात पडल्याची घटना घडली आहे.

सातपूर मधील सातपूरमळे परिसराकडून (दि. १९) रोजी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास संत सावता माळी मार्गे नंदिनी नदी वरून सातपूर च्या दिशेने जात असताना आय २० एमएच १५ एचवाय ७५७६ आपल्या चारचाकी वरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट नंदिनी नदी पात्रात कोसळले. चारचाकीतुन गाडी मालकाने आपली सुटका करून घेतली. परंतु रात्री च्या सुमारास मदत न मिळाल्याने वाहन मालक गाडी तशीच ठेवून निघून गेला. दि.२० रोजी सकाळी घटना उघडकीस आली तेव्हा नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. सदर घटनेत जीवित हानी झालेली नसून, गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सातपूर मळे परिसराच्या बाजूने नदी पात्र लागत संरक्षण रेलिंग नसल्याने मोठे अपघात होत आहेत. संरक्षण रॅलीग बसवण्याची मागणी मा. स्वीकृत नगरसेवक विजय भदुरे यांनी केली आहे. अधिक तपास सातपूर पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

The post चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार नदी पात्रात कोसळली appeared first on पुढारी.