जळगाव : तपासणी नाक्याजवळ 22 लाखांचा गुटखा जप्त

गुटखा जप्त

जळगाव : राज्यात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीला बंदी असताना मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रोडवरील कर्की सीमा तपासणी नाक्याजवळ पोलिसांनी 22 लाख 60 हजार रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू व गुटखा जप्त केला आहे. एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो पिकप गाडी एम एच १९ सी वाय 5338 विक्री, वितरण व साठा करण्यास प्रतिबंध असलेल्या गुटखा याची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर रोडवरील कर्की सीमा तपासणी नाक्याजवळ संशयित आरोपी प्रेमचंद हरिराम पंजवानी (वय 35, रा. सिंधी कॉलनी, चोपडा रोड, अंमळनेर) हा मिळून आला.

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून बोलेरो गाडी मधून 3 लाख 96 हजाराचा किंग केशर युक्त विमल पान मसाला चे 2000 पाकीट, 11 लाख 22 हजार रुपये केसर युक्त विमल पान मसाल्याचे एकूण 6000 पाकिटे, 44 हजार रुपये किमतीचे किंग विमल तंबाखूचे एकूण 2000 पाकिटे, एक लाख 98 हजार रुपये सहा हजार तंबाखूचे पाकिटे व पाच लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची महिंद्रा कंपनीची बोलेरो गाडी असा एकूण 22 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी प्रेमचंद पंजवानी याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरेकर हे करीत आहेत.

हेही वाचा :

The post जळगाव : तपासणी नाक्याजवळ 22 लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.