जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळले, अधिकाऱ्यासह कर्मचारी ठार

jalgaon accident

जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळून झालेल्या अपघातात पोलीस अधिकार्‍यासह चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एरंडोल शहराजवळ गुरुवारी (दि. २९ ) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत इतर तीन कर्मचाऱ्यांना देखील दुखापत झाली आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जळगाव गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पिलखोड, ता.चाळीसगाव येथे शासकीय वाहनाने (एम.एच.१९ एम.०७५१) गेले होते. चौकशीनंतर रात्री पथक जळगावकडे येत असताना एरंडोल शहराजवळील अंजनी धरणाजवळ वादळी वाऱ्यामुळे जीपच्या पुढील भागावर झाड कोसळले. यात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय चौधरी यांचा मृत्यू झाला असून चंद्रकांत शिंदे, नीलेश सूर्यवंशी, भरत जेठवे हे देखील जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर एरंडोल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांनी घटनास्थळी धाव घेवून माहिती घेतली. जखमी तिघाही पोलिसांना जळगाव येथे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा : 

The post जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळले, अधिकाऱ्यासह कर्मचारी ठार appeared first on पुढारी.