जिल्हा प्रशासनाची तयारी : ज्येष्ठांसाठी पोस्टल मतदान एैच्छिक

पोस्टल मतदान pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणूकांची घोषणा झाली असून नाशिक व दिंडोरी मतदारसंघाकरीता २० मे रोजी मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. जिल्ह्यात दोन्ही मतदारसंघात निवडणूक प्रक्रीयेसाठी सुमारे ४० हजार कर्मचारी तैनात केले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांसोबत ८० वर्षावरील ज्येष्ठांना घरबसल्या पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ज्येष्ठांसाठी ही पोस्टल मतदान हे एैच्छिक असणार आहे.

निवडणूकांच्या घोषणेनंतर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. मतदारांना मतदान केंद्रा वर विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासह छोट्या-छोट्या बाबींवर प्रशासन लक्ष देत आहे. आयोगाच्या सूचनेनूसार प्रशासनाने निवडणूक कामासाठी नेमणूक केलेल्या मतदारांसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासोबत यंदा पहिल्यांदाच ८० वर्षावरील ज्येष्ठ व ४० टक्यांहून अधिक दिव्यांग मतदारांनाही घरबसल्या पोेस्टल मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बजावता येईल. त्यानूसार १ लाख ३२ हजार ५३२ ज्येष्ठांना ही संधी उपलब्ध असणार आहे. त्यासाठी प्रथमत: ज्येष्ठांकडून संमतीपत्र भरुन घेतले जाणार आहे. त्यासंदर्भात मंगळवारी (दि.१९) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बीएलओंचे प्रशिक्षण पार पडले. त्यामध्ये पोस्टल मतदान करायचे आहे, याची माहिती गोळा करावी, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या. बीएलओंकडून माहिती प्राप्त झाल्यानंतरच खऱ्याअर्थाने पोस्टल मतदारांची संख्या स्पष्ट होईल, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी दिली.

हेही वाचा:

The post जिल्हा प्रशासनाची तयारी : ज्येष्ठांसाठी पोस्टल मतदान एैच्छिक appeared first on पुढारी.