थंडीपासून द्राक्षबागा वाचवण्यासाठी धडपड

द्राक्षबागा,www.pudhari.news

लासलगाव: पुढारी वृत्तसेवा– निफाड तालुक्यात तापमानाचा पारा घसरल्याने द्राक्ष बागा वाचवण्यासाठी शेकोटी पेटवण्यास सुरुवात झाली आहे. मागील दोन-तीन दिवसात निफाड तालुक्यात तापमानात मोठी घट झाल्याने द्राक्ष बागा वाचवण्यासाठी धावपळ सुरू झाल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.

नाशिक जिल्ह्यात नोव्हेंबर व डिसेंबर महिना सामान्य थंडी होती. परंतु जानेवारीत तापमानात चढ-उतार बघावयास दिसत असून तीन दिवस घसरण होत आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण लक्षात घेता तयार झालेल्या द्राक्षमण्यांना तडे जाण्याची शक्यता जास्त आहे. कडाकाच्या थंडीत द्राक्ष बागा वाचवण्यासाठी पहाटेच्या वेळेस ठिबकद्वारे विहिरीचे पाणी देणे व शेकोटी पेटवून धुर करून ऊब देणे असे प्रकार शेतकऱ्यांना करावे लागत आहे. द्राक्षाबरोबर कांदा पिकाच्या पातीवर करप्याचा प्रादुर्भाव होण्याची भीती निर्माण झाले आहे त्यामुळे कांद्याची वाढ खुंटते.

सध्या निफाड तालुक्यात दिवसा कडक ऊन व रात्री थंडीचे प्रमाण वाढत आहे. दव व धुक्यामुळे द्राक्षमण्यांच्या फुगणीवर विपरीत परिणाम होणार आहे. -सुनिल गवळी, ब्राह्मणगाव विंचूर

हेही वाचा :

The post थंडीपासून द्राक्षबागा वाचवण्यासाठी धडपड appeared first on पुढारी.