दादा खमक्या माणूस, त्यांच्याशिवाय पर्याय नाही : आमदार कोकाटे

आमदार माणिकराव कोकाटे, अजित पवार

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नुसतेच आमदार म्हणून मिरवण्यात अर्थ नसतो. मतदार संघातील जनतेचे प्रश्न सुटले तर लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्याचे समाधान असते. सिन्नर मतदारसंघात अद्यापही खूप कामे करायची आहेत. त्यामुळे दादांशिवाय पर्याय नाही, असे म्हणत आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोनामुळे सुरुवातीची दोन-अडीच वर्षे वाया गेली. सरकार बदलल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक रुपया निधी दिला नाही. मतदार संघात खूप कामे रखडलेली आहे. मी जनतेचे विकासाचा शब्द दिलेला आहे. दादा खमक्या माणूस आहे. कामे करायची असेल तर सरकारसोबत म्हणजेच दांदासोबत जावेच लागेल. मी अजित पवारांसोबत असलो तरी शरद पवारांच्या विरोधात नाही. ते आमचे नेते आहेत, असेही आमदार कोकाटे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : 

The post दादा खमक्या माणूस, त्यांच्याशिवाय पर्याय नाही : आमदार कोकाटे appeared first on पुढारी.