दादा भुसे बदनामी प्रकरण : संजय राऊत यांना ६ मार्चपर्यंत दिलासा

Sanjay Raut: संजय राऊत

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा- नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार दादा भुसे यांची बदनामी करणारी बातमी खासदार संजय राऊत यांनी दै. सामना या वृत्तपतत्रात प्रसिध्द केली होती. या प्रकरणी खा. राऊत यांच्यावर मालेगाव न्यायालयात फौजदारी खटला दाखल आहे. या खटल्याची सुनावणी मालेगाव न्यायालयात सुरू आहे. त्यांचे वकील एम. व्ही. काळे यांनी याबाबतच्या सुनावणीसाठी नाशिक जिल्हा कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे जिल्हा न्यायालयाचे कामकाज पूर्ण होईपर्यंत तूर्तास मालेगाव न्यायालयात सुनावणी होणार नसल्याने खा. राऊत यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान येत्या ६ मार्च रोजी नाशिक जिल्हा न्यायालयात या खटल्याबाबत पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायालयातर्फे देण्यात आली आहे.

गिरणा साखर कारखाना शेअर्स घोटाळा बदनामी खा. राऊत यांविरोधात दाखल प्रकरणाची शुक्रवारी (दि.१६) मालेगाव न्यायालयात सुनावणी झाली. याप्रसंगी राऊत गैरहजर राहिल्याने त्यांचे वकील काळे यांनी मालेगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश बहाळकर यांच्या न्यायालयात रिव्हिजन दाखल केले. खालच्या न्यायालयाने दिलेला निर्णय हा वरच्या न्यायालयात चॅलेंज केला. या जिल्हा न्यायालयाने खालच्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला दि. ६ मार्चपर्यत स्थगिती दिली आहे. मालेगाव न्यायालयातील सुनावणी ही २८ मार्चला होईल. तर नाशिक जिल्हा न्यायालयाची सुनावणी ही दि. ६ मार्चला होणार आहे. असे असले तरी जिल्हा न्यायालयाचे कामकाज जो पर्यंत संपत नाही, तो पर्यंत खालच्या न्यायालयाचे कामकाज हे चालणार नसल्याची माहिती पालकमंत्री भुसे यांचे वकील एस. बी. अक्कर यांनी दिली.

हेही वाचा :

The post दादा भुसे बदनामी प्रकरण : संजय राऊत यांना ६ मार्चपर्यंत दिलासा appeared first on पुढारी.