धुळे : औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात तब्बल 55 लाखांची वीजचोरी उघड; दोघां विरोधात गुन्हा दाखल

वीजचोरी

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे येथील अवधान शिवारातील औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून एका कारखान्यात वीज चोरी होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात दोघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या कारखान्यासाठी तब्बल 55 लाख 22 हजार 570 रुपयाची वीज चोरी करून वीज वितरण कंपनीचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

धुळे येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एका कारखान्यात वीज चोरी होत असल्याची कुणकुण वीज वितरण कंपनीच्या पथकाला होती .त्यामुळे या पथकाने अवधान शिवारातील औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर 8 डब्ल्यू या ठिकाणी सुरू असलेल्या प्लास्टिक इंडस्ट्रीज वर छापा मारला. यावेळी या कारखान्यांमध्ये संबंधितांनी वेळोवेळी वीज मीटर हाताळून योग्य वीज वापराची नोंद मीटर मध्ये होणार नाही ,अशी व्यवस्था केल्याची बाब निदर्शनास आली. वीज चोरीच्या व फसवणुकीच्या उद्देशाने सुमारे दोन वर्षांपासून वीज चोरी सुरू असल्याची बाब निदर्शनास आली. या कारखान्यात 140 लोड भार वर तब्बल दोन लाख 91 हजार 252 युनिट वीज चोरी झाल्याची बाब निदर्शनास आली आहे. ही चोरी 55 लाख 22 हजार 570 रुपयाची वीज चोरी झाल्याची तक्रार देण्यात आली. त्यानुसार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात मोहम्मद मुबीन असिउल्ला खान आणि शबनम प्लास्टिक इंडस्ट्रीज या दोघांच्या विरोधात भारतीय वीज कायदा कलम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान अवधान औद्योगिक वसाहतीचे कार्यक्षेत्र मोहाडी पोलीस ठाणे अंतर्गत येत असल्यामुळे हा गुन्हा मोहाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post धुळे : औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यात तब्बल 55 लाखांची वीजचोरी उघड; दोघां विरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.