धूम्रपान करताना पकडलं, भीतीपोटी विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी

धुम्रपान करताना पकडलं,www.pudhari

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– तिडके कॉलनी परिसरातील एका शाळेच्या इमारतीवरून आठवीतील विद्यार्थिनीने उडी मारल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सुदैवाने विद्यार्थिनीस गंभीर दुखापत झाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी धूम्रपान करत असताना तिला शालेय व्यवस्थापनाने पाहिल्यानंतर भीतीपोटी तिने इमारतीवरून उडी मारल्याचे समजते.

उडी मारणारी १५ वर्षीय विद्यार्थिनी शाळेत आठवीच्या वर्गात शिकत आहे. गुरुवारी (दि.१५) सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. तिला शाळेच्या परिसरात धूम्रपान करताना शालेय व्यवस्थापनाच्या कर्मचाऱ्याने पाहिले. आपली तक्रार होईल, या भीतीने ती विद्यार्थिनी घाबरली. त्यानंतर काही क्षणात तिने शाळेच्या इमारतीवरून उडी मारली. यात तिचा पाय फ्रॅक्चर झाला. तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करत उपचार सुरू करण्यात आले. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post धूम्रपान करताना पकडलं, भीतीपोटी विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी appeared first on पुढारी.