ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांवर गुन्हे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित मिरवणूकीत ध्वनी प्रदुषण मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी डीजे चालकांसह मंडळाचे पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुने नाशिक परिसरातून निघालेल्या मिरवणूकीत ध्वनी प्रदुषण झाल्याने मिरवणूक संपल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री डीजे मालकांसह मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर सात गुन्हे दाखल केले आहेत.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील जुने नाशिक व नाशिकरोड परिसरातून सार्वजनिक मंडळांनी मिरवणूका काढल्या. त्यात जुने नाशिक ते शालिमार या मिरवणूकीत सहभागी झालेल्या मंडळांनी डीजे लावत ध्वनी प्रदुषणाचे उल्लंघन केले. तसेच रस्त्यालगत उभारलेल्या मंडपांवरही मोठ्या आवाजात स्पिकर लावल्याचे आढळून आले. ध्वनीमर्यादेचे उल्लंघन न करण्याच्या सूचना पोलिस आयुक्तालयाने शांतता समितीच्या बैठकीत दिल्या होत्या. तरीदेखील रविवारी (दि.१४) जयंती मिरवणुकीत काही मंडळांनी डीजेचा दणदणाट करीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केले होते. याप्रकरणी पोलिसांनी मध्यरात्रीपर्यंत ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजेचालक व मंडळांवर कारवाई केली. परिमंडळ एकमध्ये ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा –

The post ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांवर गुन्हे appeared first on पुढारी.