नांदगावी शॉपिंग सेंटर गाळ्यांचा लिलाव प्रक्रिया पूर्ण

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा- नांदगाव नगरपरिषद तर्फे महात्मा फुले चौक जवळील शॉपिंग सेंटर गाळ्यांचा जाहीर भाडेकरार लिलाव प्रक्रिया मंगळवार (दि. २०) नांदगाव नगरपरिषदेच्या वतीने शहरातील जैन धर्मशाळा, मालेगाव रोड या ठिकाणी पार पडली.

यावेळी तळमजल्यावरील सर्व मजल्यावरील गाळ्यांचे तसेच दुसऱ्या मजल्यावरील दोन ७३ गाळ्यांपैकी ४६ गाळयांचा लिलाव प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या वेळी ५१,४०००० रुपयांची सर्वोच्च बोली आसाराम दुबे यांनी लावली. या लिलाव प्रक्रियेतून प्रक्रियेत सहभागी लिलावधारकांकडून एकूण ५,५०,५०,०००/- (पाच कोटी पन्नास लाख पन्नास हजार रुपये) इतकी बोली लावण्यात आली .

सदरील लिलाव प्रक्रिया मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे यांच्या मार्गदर्शनातुन पार पडली. या लिलाव प्रक्रियेवेळी जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी नांदगाव हे उपस्थित होते. सदरील प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.

सदरील यशस्वी बोली धारकांनी व ओटे धारकांना पुढील पंधरा दिवसात करारनामे करत. शॉपिंग सेंटरची सर्व किरकोळ दुरुस्ती करून सर्व ओटे व गाळे लवकरच व्यवसायासाठी चालू करून देण्यात येणार आहे.

सदरील लिलाव प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी नांदगाव नगर परिषदेच्या प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे, कर निरीक्षक राहुल कुटे, लेखापाल संतोष ढोले, लेखा परीक्षक सतीश कुमार खैरे, प्रकल्प अधिकारी आनंद महिरे, संगणक अभियंता रोशनी मोरे, वरिष्ठ लिपिक विजय कायस्थ, बीबी शिंदे, अरुण निकम, अंबादास सानप, रामकृष्ण चोपडे, आकाश जाधव, दीपक वाघमारे, अनिल पाटील,  सुनील पवार, निलेश देवकर यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नांदगावी शॉपिंग सेंटर गाळ्यांचा लिलाव प्रक्रिया पूर्ण appeared first on पुढारी.