Nashik : शेतकऱ्यांनी खचून न जाण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

दादा भुसे,www.pudhari.news

चांदवड (जि.नाशिक ): पुढारी वृत्तसेवा; नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांत रविवारी (दि.26) अवकाळी पाऊस व गारपीट झाली आहे. या गारपिटीत कांदा, द्राक्ष, डाळींबासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा, कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांना दिल्या आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांनी खचून न जाण्याचे आवाहन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

चांदवडला आयोजीत शेतकरी मेळावा व पाणी परिषदेत पालकमंत्री भुसे बोलत होते. गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने चांदवडचा कार्यक्रम रद्द केला. यावेळी चांदवड तालुक्यातील खेलदरी, शिंगवे येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास भुजाडे यांच्याकडून प्रत्येकी ११ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, सुनील पाटील, तालुकाप्रमुख विकास भुजाडे, निवृत्ती घुले, शांताराम ठाकरे, रोशनी कुंभार्डे, संदीप उगले, दत्ता गांगुर्डे, भागवत जाधव, दीपक भोईटे, गणेश निंबाळकर, कविता उगले, अनिल काळे, प्रभाकर ठाकरे, आदींसह मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Nashik : शेतकऱ्यांनी खचून न जाण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन appeared first on पुढारी.