नांदगाव शहरात होणार क्रमाने पाणीपुरवठा

नांदगाव,www.pudhari.news

नांदगाव(जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा – नांदगाव शहरातील पाणीपुरवठा क्रमवारीने होणार असल्याची माहिती नांदगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी दिली. नांदगाव नगर परिषदेमधील पत्रकार परिषदे दरम्यान ते बोलत होते. नगरपरिषदेच्या वतीने शहरातील 44 भागांमध्ये पाणीपुरवठा केला जात असतो, यासाठी तालुक्यातील दहेगाव, माणिकपुंज, गिरणा या तीन धरणांच्या माध्यमातून नांदगाव शहराला पाणी उपलब्ध होत असते. रंतु सद्या दहेगाव धरण कोरडे असल्याने, उरलेल्या दोन धरणातूनच शहरास पाणीपुरवठा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यातही माणिकपुंज धरणातून शहरात पाणी वाहून आणणाऱ्या पाईपलाईनची मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने, तसेच गिरणा धरणातून देखील सद्यस्थितीत महिन्यातून एकदाच शहराला पाणी मिळत असल्याने, शहराला पाहिजे तेवढा पाणीपुरवठा उपलब्ध होत नसल्यामुळे, पाणीपुरवठा करण्यास अडथळा येत असल्याचे त्यांनी सांगितले. तरी उपलब्धते नुसार यापुढे, 44 भागांमध्ये क्रमवारीनुसारच पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तरी सध्या पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात असल्याने, नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आव्हान देखील त्यांनी या वेळेस केले.  या पत्रकार परिषदेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष बहाकर, नगरपरिषदेची कुटे उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नांदगाव शहरात होणार क्रमाने पाणीपुरवठा appeared first on पुढारी.