नाशिककरांनो काळजी घ्या : मनपा रुग्णालयात तापाचे ‘इतके’ रुग्ण

थंडी, तापाने रुग्ण बेजार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या साथीच्या आजारांपाठोपाठ नाशिककर व्हायरल तापाने फणफणले आहेत. गेल्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात महापालिकेच्या रुग्णालयांत व्हायरल तापाचे 4,424 रुग्ण आढळून आले आहेत. मनपा रुग्णालयांव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍यांची संख्या मोठी असण्याची शक्यता आहे.

गेल्या दीड दोन महिन्यांपासून स्वाइन फ्लू, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात स्वाइन फ्लूचे 136 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील रुग्णालयांमध्ये शहराबाहेरील रुग्णांची संख्या 78 इतकी आहे. त्यापैकी 14 जण मृत्युमुखी पडले. डेंग्यूग्रस्तांची संख्या 172 इतकी आहे. यात ऑगस्ट महिन्यातच 99 नवीन बाधित आढळले आहेत. चिकुनगुनियाचे 17 नवे रुग्ण आढळले आहेत. तर व्हायरल तापाच्या साथीनेदेखील नाशिककर फणफणले असून, ऑगस्ट महिन्यात 4,424 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 1 ते 6 सप्टेंबर या कालावधीत व्हायरल तापाचे 209 रुग्ण आढळले आहेत. व्हायरल तापाखेरीज ऑगस्टमध्ये अतिसाराचे 936, तर विषमज्वराचे 28 नवे रुग्ण आहेत.

हवामानातील बदलांमुळे व्हायरल ताप यासारख्या आजाराची बाधा निर्माण होते. घसा खवखवणे हे या आजाराचे मुख्य लक्षण होय. तसेच नाक वाहणे, ताप, खोकला, अंगदुखी अशी लक्षणेही दिसून येतात. परंतु, रुग्णांनी घाबरून जाऊ नये. वैद्यकीय उपचार तत्काळ घेतल्यास आजारातून बरे होता येते.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे,
वैद्यकीय अधिकारी, मनपा

हेही वाचा :

The post नाशिककरांनो काळजी घ्या : मनपा रुग्णालयात तापाचे 'इतके' रुग्ण appeared first on पुढारी.