नाशिकच्या बागलाण तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने बिबट्यांचा मृत्यू

बिबट्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील तांदूळवाडी येथे गोप्या डोंगराच्या पायथ्याशी बिबट्या आणि बछड्याचे मृतदेह आढळले. वाढत्या उन्हामुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वनविभागाने वर्तवली आहे. ताहराबाद आणि वन परिक्षेत्रातील अधिकारी शिवाजी सहाणे त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.

मृत बिबट्या आणि बछड्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली. बागलाणमध्ये उन्हामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याची दुसरी घटना आहे. दीड वर्षांपूर्वी बिबट्याचा येथे असाच मृत्यू झाला होता. ताहाराबाद वनपरिक्षेत्र अंबासन ते मुल्हेर क्षेत्रात दीडशे ते २०० च्या आसपास विवटे असायचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा :

The post नाशिकच्या बागलाण तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेने बिबट्यांचा मृत्यू appeared first on पुढारी.