नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शालिमार येथील वावरे लेन परिसरातून अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांकडून ६०४ किलो भांग जप्त केली आहे. याप्रकरणी पथकाने दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार अंमली पदार्थ विक्री, खरेदी,वाहतूक व साठेबाजी रोखण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक नेमण्यात आले आहे. या पथकामार्फत शहरात अंमली पदार्थांची साठा, विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जात असते. त्यानुसार पथकातील पोलिस अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना मिळालेल्या माहितीवरून वावरे लेन येथे दोघे भांग हा मादक पदार्थ विक्री करत असल्याचे समजले. त्यानुसार माहितीची खात्री करून गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे, एच. के. नागरे, पी. बी. सुर्यवंशी, अंमलदार नांद्रे, गणेश भामरे, देवकिसन गायकर, रंजन बेंडाळे, विनायक आव्हाड, भारत डंबाळे, नितीन भालेराव आदींच्या पथकाने वावरे लेन येथे सापळा रचून कारवाई केली.
त्यात पवन सुकदेव वाडेकर (२५, रा. म्हाडा कॉलनी, आडगाव शिवार) व ज्ञानेश्वर बाळू शेलार (२८, रा. वावरे लेन) यांना पथकाने ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी दोघांकडे ६०४ किलो ३०० ग्रॅम वजनाचा भांग साठा आढळून आला. या भांगची किंमत तीन लाख ३० हजार १५३ इतकी आहे. दोघांविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Strike of Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्राचा आज संप; बैठक अयशस्वी झाल्यास पाच दिवस संप?
- प्रजासत्ताक दिनाच्या प्रभातफेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने विद्यार्थीनीचा मृत्यू
- धक्कादायक! नांदेड ऑनर किलिंगने हादरले; भाऊ, वडिलाने मुलीचा खून करून राख ओढ्यात टाकली
The post नाशिकच्या शालिमार येथून ६०० किलो भांग जप्त appeared first on पुढारी.