नाशिकमध्ये आजपासून खान्देश महोत्सव

खान्देश महोत्सव www.pudhari,news

सिडको : पुढारी वृत्तसेवा- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे आयोजित चारदिवसीय खानदेश महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. 22) भव्य शोभायात्रेने होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

विजयनगर येथून सकाळी 8 वाजता ही शोभायात्रा निघून पवननगर, दिव्या ॲडलॅब, त्रिमूर्ती चौक मार्गे ठक्कर डोम येथे पोहोचणार आहे. शोभायात्रेत खानदेशचा सजवलेला रथ, उंट, घोडे, बैलगाडी, लेझीम पथक, आदिवासी नृत्य पथक, डोंबाऱ्यांचे कसरतीचे खेळ आदींसह पारंपरिक वेशभूषेतील खानदेशी बांधव हे शोभायात्रेचे आकर्षण असणार आहे. सकाळी 11 वाजता ठक्कर डोम येथे पालकमंत्री भुसे, आमदार सीमा हिरे, माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. यावेळी आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले, भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, महेश हिरे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती महोत्सवाच्या आयोजक आमदार सीमा हिरे व संयोजक रश्मी हिरे बेंडाळे यांनी दिली. यावेळी मराठी साहित्य व अहिराणी कविसंमेलनही आयोजित केले असून, सायंकाळी 7 वाजता खानदेशी बँड व कानबाईची गाणी असा कार्यक्रम होणार आहे.

खानदेश महोत्सव कार्यक्रमाचे स्वरूप:

शुक्रवार : अहिराणी कविसंमेलन, खानदेशी बॅण्ड व कानबाई गाणे

शनिवार : इंटरस्कूल कल्चरल डान्स स्पर्धा, न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा

रविवार : सांस्कृतिक नृत्य स्पर्धा, महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम, लावणी क्वीन माधुरी पवार यांचे नृत्य, खानदेश रत्न पुरस्कार सोहळा

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये आजपासून खान्देश महोत्सव appeared first on पुढारी.