नाशिकमध्ये गोमांस विकणारे दोघे गजाआड

arrested www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले. दोघांकडून पिकअप वाहनासह सुमारे 500 किलो मांस असा मुद्देमाल जप्त केला.

अमीर कुरेशी (२७, रा. संगमनेर, जि. नगर) व सलमान कुरेशी (२८, रा. चौक मंडई, भद्रकाली) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. अंमलदार मुक्तार शेख व आप्पा पानवळ यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, नाईक मिलिंदसिंग परदेशी, अंमलकार शेख, पानवळ, राजेश राठाेड, नितीन जगताप, जगेश्वर बोरसे, राहुल पालखेडे, किरण शिरसाठ यांच्या पथकाने मुंबई नाका येथील खोडेनगर परिसरात सापळा रचला. एमएच १५ डीएम ३००६ क्रमांकाच्या पिकअप वाहनास अडवून तपासणी केली असता, त्यात मांस आढळून आले. सखोल तपासात अमीर कुरेशी हा गोमांस सलमान कुरेशी यास आणून देत होता व सलमान त्याची विक्री करीत होता, असे पुढे आले. पथकाने आठ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये गोमांस विकणारे दोघे गजाआड appeared first on पुढारी.