नाशिक : गोदावरी, वाघाडी नदीपात्राची स्वच्छता

गोदावरी, वाघाडी नदीपात्राची स्वच्छता,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 

नाशिक महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या सुचनेनुसार संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथिनिमित्त मंगळवारी (दि.२०) विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात आली. या मोहीमेअंतर्गत गोदावरी व वाघाडी नदीपात्राची स्वच्छता करून तीन टन कचरा संकलन करण्यात आले.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभाग घनकचरा व्यवस्थापन विभागाने गोदावरी आणि वाघाडी नदी पात्राच्या परिसरात आणि प्रभागात स्वच्छता केली. गोदावरी संवर्धन विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंढे, पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थितीत मोहिम राबविण्यात आली. वाघाडी नदीजवळच्या बुरड डोह, हत्ती पुल, गणेशवाडी, संजय नगर, वाल्मिकी नगर, साबळे वाडा ढिकले नगरपर्यंत आणि गोदावरी नदी पात्राजवळच्या कन्नमवार पुल ते लक्ष्मीनारायण मंदिरपर्यंतच्या परिसरात तसेच विभागातील सप्तरंग, मोरेमला, शिवसमर्थ नगर, दुर्गा नगर, गोरक्ष नगर, ओमकार नगर आदी परिसरातील 3 टन प्लास्टिक आणि तत्सम कचरा घंटागाडीमार्फत संकलित करण्यात आला. यावेळी मलेरिया विभागामार्फत नदी परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

प्लास्टिक बंदीबाबत जागृती

पंचवटी विभागातील बुरडवाडी, वाल्मीक नगर, गणेशवाडी, वाघाडी, ढिकले नगर आणि नदी पात्रालगत राहणा-या नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली. नदी पात्रात कचरा न टाकता विलगीकरण करुन कचरा घंटागाडीतच टाकण्याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीचा वापर करु नका, असेही आवाहन नागरिकांना करण्यात आले. विशेष स्वच्छता मोहिमेत स्वच्छता निरीक्षक दुर्गादास मालेकर, उदय वसावे, दीपक चव्हाण, किरण मारू, मुकादम बी. के. पवार, संजय मकवाना, दिनेश सोलंकी, संजय पडाया, अनिल नीलकंठ, शिवाजी सूर्यवंशी, मलेरिया विभागाचे कैलास पांगरकरसह सहा कर्मचारी तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाचे १५८ आणि वॉटरग्रेस प्रोड्क्टसचे २३ असे एकूण मिळून १८७ कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग होता.

हेही वाचा :

The post नाशिक : गोदावरी, वाघाडी नदीपात्राची स्वच्छता appeared first on पुढारी.