नाशिक : चक्क सुरुंगाचा ताइत लावून फोडले एटीएम, स्फोट होताच लोक जमली अन्…

एटीएम फो़डले,

नाशिक (पांगरी) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यातील पांगरी बुद्रुक येथे अज्ञात चोरट्यांनी ए. टी. एम् फोडल्याची घटना घडली. गावात सिन्नर- शिर्डी महामार्ग लगत इंडियन ओव्हरसिज बँक असून बँकेच्या एका बाजूला ए. टी. एम बसविले आहे. आज पहाटे चार ते साडे चार वाजेच्या दरम्यान अज्ञान चोरट्यांनी ए. टी. एम् फोडण्याचा प्रयत्न केला. परंतू ते फोडता आले नसावे म्हणून चोरट्यांनी ए. टी. एम् मशीन ला सुरुंगाचा ताइत लावून मशीन फोडण्याचा प्रयत्न केला.

स्फोट झाल्यावर आजुबाजूच्या परिसरातील लोक जमा व्हायला लागल्यावर चोरट्यांनी तेथून पोबारा केला. स्फोटामुळे शटर आणि आतील काचेचा दरवाजा, सीलिंग व ए. सी.च्या चिंधड्या उडाल्या. वावी पोलिस ठाण्याची पेट्रोलिंग व्हॅन तीन वाजून पंधरा मिनिटांनी तेथून गेली होती. त्या नंतर सदरची घटना घडली असावी.

आजपासून बँकांना सलग चार दिवस सुट्टी असल्याने ए. टी. एम् भरलेले असावे या हेतुने चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला असावा. बॅंक प्रशासनाकडून या बाबत ची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, पोलिस उप निरीक्षक विजय सोनवणे, बिट हवालदार सतीश बैरागी यांनी तात्काळ भेट दिली. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : चक्क सुरुंगाचा ताइत लावून फोडले एटीएम, स्फोट होताच लोक जमली अन्... appeared first on पुढारी.