नाशिक : जनशताब्दीचे इंजीन फेल; अडीच तास प्रवाशांचा खोळंबा

लासलगाव www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

जालना – दादर जनशताब्दी एक्स्प्रेसचे लासलगाव रेल्वे स्थानकादरम्यान इंजीन फेल झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 2) सकाळी घडली. त्यामुळे सुमारे अडीच तास प्रवाशांना खोळंबून राहावे लागले.

नेहमीप्रमाणे जालना येथून दादरकडे जात असलेली जनशताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेस लासलगाव ते निफाड दरम्यान सकाळी 11.30 च्या सुमारास अचानक उभी करण्यात आली. याबाबत प्रवाशांना काहीवेळ काहीच कळले नाही. मात्र, एक – दीड तास होऊनही गाडी जागेवरच उभी असल्याने याबाबत प्रवाशांनी विचारणा केल्यानंतर इंजीन फेल झाल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यात अडीच तास खोळंबा झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून, मनमाडहून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व प्रवासी गाड्या विलंबाने धावल्या.

ज्येष्ठ नागरिक, बालकांचे हाल

अचानक झालेल्या इंजीन बिघाडामुळे प्रवाशांना उन्हात तब्बल अडीच तास थांबून राहावे लागले. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान बालके, महिला प्रवाशांचे हाल झाले. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला.

हेही वाचा:

The post नाशिक : जनशताब्दीचे इंजीन फेल; अडीच तास प्रवाशांचा खोळंबा appeared first on पुढारी.