नाशिक : डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला, महिनाभरात ११० नवे रुग्ण

डेंग्यू डास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला असून, ऑगस्ट महिन्यात या आजाराचे तब्बल ११० नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही रुग्णसंख्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडील असून, प्रत्यक्षात खासगी रुग्णालयातील रुग्णसंख्येचा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.

जानेवारी महिन्यात डेंग्यूचे १७ रुग्ण आढळले होते. त्यापाठोपाठ फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रत्येकी २८ रुग्ण आढळले. एप्रिल महिन्यात ८, मेमध्ये ९, जूनमध्ये 26, तर जुलै महिन्यात डेंग्यूचे २८ नवे रुग्ण आढळले होते. ऑगस्ट महिन्यात ८०२ रक्तनमुने तपासण्यात आले. यात ११० जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले. आतापर्यंत शहरातील १,९१५ आजारी नागरिकांपैकी २५४ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नाशिकमधील रुग्णसंख्या कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात खासगी रुग्णालयांमधील रुग्णसंख्येचा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला, महिनाभरात ११० नवे रुग्ण appeared first on पुढारी.