नाशिक : तथागत महानाट्यातून उलगडला गौतम बुद्धांचा जीवनपट

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती महोत्सवा निमित्त सातपूर शहर भीम महोत्सव समितीच्या वतीने गौतम बुद्धांच्या जीवनावर आधारित तथागत महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

रंगमंचावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म या ग्रंथावर आधारित डॉ. शैलेद्र बागडे प्रस्तुत तथागत या महानाट्याचा प्रयोग सादर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील महानाट्य तथागत सातपूरच्या यंत्रभुमीत पहिल्यांदाच सादर करण्यात आले. महानाट्यातून भगवान गौतम बुद्ध यांचा जीवनपट मांडण्यात आला.

कार्यक्रमासाठी दिनकर पाटील, सलीम शेख, सुधाकर बडगुजर, इंदुबाई नागरे, पल्लवी पाटील, माया काळे, कोर कमिटीचे सदस्य रवींद्र काळे, रवींद्र धिवरे, अरुण काळे, काळुुजी काळे, नंदकुमार जाधव, योगेश गांगुर्डे आदी उपस्थित होते. अध्यक्ष हर्षल काळे, कार्याध्यक्ष सत्यवान चक्रे, उपाध्यक्ष प्रशांत जगताप, खजिनदार पंडित नेटावटे यांनी यशस्वीतेसाठी मेहनत घेतली.

हेही वाचा : 

The post नाशिक : तथागत महानाट्यातून उलगडला गौतम बुद्धांचा जीवनपट appeared first on पुढारी.