नाशिक : निफाडमध्ये युरियाचा काळा बाजार, मुंबईला जाणारा ट्रक पकडला

निफाडमध्ये युरिया घोटाळा,www.pudhari.news

दीपक श्रीवास्तव, निफाड

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार पहाटे 1 वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील भरवस फाटा परिसरात छापा मारून काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा 20 लाख रुपये किंमतीचा युरिया खताचा मोठा साठा ताब्यात घेतला.

या बाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार निफाड तालुक्यातील लासलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भरवस फाटा नांदगाव रस्त्यावरील एका  वस्तीवर केंद्र शासन अनुदानित प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परीयोजना शिक्का असलेल्या 20 लाख रुपयांच्या 400 ते 500 गोण्या मधील युरिया खत दुसऱ्या खाजगी गोण्या मध्ये भरून mh 18 Bh 1786 या ट्रक द्वारे मुंबईला घेवून जात असतांना निफाडला हा मालट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. एक संशयित सह सदर ट्रक चा चालक व वाहक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शेतकऱ्यांना  मुबलक युरिया मिळावा म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जन उरवरक परीयोजना चालू केली. या अंतर्गत शेतकऱ्यांना युरियाची गोणी 280 रुपयांना मिळते. शेतकऱ्यांना युरिया मुबलक मिळत नाही व घ्यायचा असल्यास आधारकार्ड लिंक करून युरिया घ्यावा लागतो तर कृषी निविष्ठा विक्रेत दुकानदार युरिया तस्करांना ही गोणी 2000 हजार रुपये दराने विकतात. युरिया तस्कर ही गोणी मुंबईत कंपनीला 5000 रुपये प्रमाणे विक्री करतात अशी चर्चा आहे.

The post नाशिक : निफाडमध्ये युरियाचा काळा बाजार, मुंबईला जाणारा ट्रक पकडला appeared first on पुढारी.