नाशिक : पालकमंत्र्यांनी पकडली गोवंश वाहतूक करणारी पिकअप

दादा भुसे,www.pudhari.news

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

मुंबई आग्रा महामार्गाने जनसंपर्क दौरा करीत असलेल्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या वाहनाला एका भरधाव वेगातील पिकअप वाहनाने कट मारत वाहन दामटले. या वाहनाचा पाठलाग करत संयोग हॉटेलजवळ ते रोखण्यात आले असता त्यात गोवंश मिळून आलेत. पालकमंत्र्यांनी तत्काळ पोलिस आणि वाहतूक पोलिसांना पाचारण करीत चालकासह वाहन तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही जनावरं कत्तलीसाठी नेण्यात येत होती का याबाबत पोलीस तपास करत आहेत. पालकमंत्री भुसे यांनी यापूर्वी मटका जुगार अड्ड्यावर छापा तसेच चोरटा पकडला होता. दरम्यान मालेगाव मध्यचे माजी आमदार आसिफ शेख यांनी या घटनेवरच प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे. मूळात ही जनावरं बाजार समितीत घेऊन जात असतील तर त्या चालकाला रस्त्यात अडवून मारण्याचा अधिकार कुणी दिला, असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : पालकमंत्र्यांनी पकडली गोवंश वाहतूक करणारी पिकअप appeared first on पुढारी.