नाशिक : केद्राई धरणात बुडून माय-लेकीचा मृत्यू

बुडून मृत्यू

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील खडक ओझर येथील श्री केद्राई देवीच्या नवसपूर्तीसाठी आलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील आईचा, तिच्या सात महिन्यांच्या चिमुकलीसह केद्राई धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 14) घडली. याबाबत वडनेरभैरव पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अकोले तालुक्यातील नाईकवाडी शाहूनगर येथील वडार समाजाचे नागरिक शुक्रवारी खडक ओझर येथील श्री केद्राई माता मंदिरात नवसपूर्तीसाठी आले होते. यावेळी ज्या सात महिन्यांच्या मुलीबाबत नवस होता, ती तन्वी नीलेश देवकर व तिची आई अर्चना नीलेश देवकर (22) या दोघी मायलेकी केद्राई धरणातील पाण्यात बुडाल्या. या घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांनी घटनास्थळी पोहोचून नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.

The post नाशिक : केद्राई धरणात बुडून माय-लेकीचा मृत्यू appeared first on पुढारी.