नाशिक : पोलिसांनी कोम्बिंगमधून तपासली अट्टल गुन्हेगारांची कुंडली

police

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात जबरी चोरीचे प्रमाण वाढल्याने शहर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून रेकॉर्डवरील चोरट्यांचा शोध घेतला. त्यात आढळून आलेल्या चोरट्यांची माहिती संकलित करीत त्यांचा नुकत्याच झालेल्या गुन्ह्यांमध्ये समावेश होता की नाही, याचीही शहानिशा केली. तसेच चोरट्यांचे उदरनिर्वाहाचे साधन, त्यांचे नातलग, निवासाचे ठिकाण आदी माहिती गोळा केली.

शहरात दुचाकीस्वार चोरटे पादचारी नागरिकांकडील दागिने, मोबाइल, रोकड हिसकावून पसार हाेत असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अशा चोरट्यांना पकडण्यासाठी शहरात मंगळवारी (दि. ४) सायंकाळी सहा ते आठ दरम्यान कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यात जबरी चोरी करणाऱ्या १८५ चोरट्यांची यादी तयार करून त्यांचा शोध घेतला. त्यापैकी ५५ गुन्हेगार आढळून आले. पोलिसांनी या गुन्हेगारांची सर्व माहिती संकलित करीत त्यांचा गुन्ह्यात सहभाग नसल्याची खात्री केली. या चौकशीमुळे व माहिती संकलित केल्याने गुन्हेगारांमध्ये धाक राहील, असा विश्वास पोलिसांनी वर्तवला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पोलिसांनी कोम्बिंगमधून तपासली अट्टल गुन्हेगारांची कुंडली appeared first on पुढारी.