नाशिक : बैलाने वाचवले धन्याचे प्राण, शेतात आलेल्या बिबट्यांना लावले पिटाळून

बिबट्या

देवळाली कॅम्प (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक तालुक्यातील वंजारवाडी येथील शेतकरी नारायण सामोरे शेत नांगरणी करत असताना शेतात अचानक दोन बिबट्या आणि दोन बछडे दृष्टीस पडले, त्यांना पाहताच बैलजोडी सैरावैरा धावत सुटल्याने बिबट्यानेही शेतातून पळ काढला. हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या बिबट्याला बैलांनी हल्ल्यापासून परावृत्त केल्याने या शेतकऱ्याचा जीव वाचला. मात्र यामुळे परिसरत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी (दि. 8) नारायण बापूराव सामोरे शेत नांगरणी करत असताना अचानक बैलजोडी बिथरली. त्यावेळी नारायणाला बिबट्याच्या सोबतच बछडे असल्याने तो चाल करत आहे, असे लक्षात आले. मात्र बैलांच्या धावपळीने बिबट्यासह बछडे पळून गेली. त्यामुळे नारायण सामोरे मोठ्या संकटातून वाचले.

परिसरातील शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेती करावी लागत असून, सोबतच आपल्या जनावरांचीही चिंता त्यांना सतावत आहे. ही बाब गंभीर असून वनविभागाने येथे पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : बैलाने वाचवले धन्याचे प्राण, शेतात आलेल्या बिबट्यांना लावले पिटाळून appeared first on पुढारी.