Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

नांदगाव

नांदगाव: (सचिन बैरागी )

जुन महिन्यात थोडेफार प्रमाणात पाऊस पडल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ६३ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी करण्यात आली होती. यंदा खरीप पेरणीनंतर पावसाने तालुक्यात पाठ फिरवल्याने पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने पिकांची वाढ खुंटली आणि आणि पिके करपली आहेत. आता पाऊस पडला तरी त्याचा फायदा खरीप पिकांना होण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातून खरीप हंगाम निसटून जाताना दिसत आहे.

तालुक्यात खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, मका, तुर, मुग, उडीद, कुलथी, भुईमूग, तिळ, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस इत्यादी पिके घेतली जातात. जर भविष्यात पाऊस पडलाच तर त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होऊ शकतो. यामुळे लवकरात लवकर पाऊस पडावा आणि रब्बी हंगाम तरी हाती लागावा, अशी आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

लाला कांदा पिक धोक्यात

थोडेफार शिल्लक असलेल्या पाण्यावर शेतकऱ्यांकडून लाल कांद्याचे रोप लागवडी योग्य करण्यात आले. कांदा रोप लागवडीस आले, पंरतु पाऊस नसल्याने कांदा लागवड करणे शक्य नसल्याने लाल कांद्याचे रोप आता शेतातच सोडुन देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे भविष्यात पाऊस झाला तरी कांदा लागवडीसाठी कांदा रोप उपलब्ध होणार नाही. यामुळे लाल कांद्याची लागवड धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जनावरांचा चारा पाण्याचा प्रश्न गंभीरतालुक्यात एकुन ६० हजार ७७२ इतकी पशुधन संख्या असून पाऊसच नसल्याने सद्यस्थितीत डोगंरासह गायरानावर कुरन गवत उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे मागील वर्षाचा थोडाफार टिकून आसलेला जनावरांचा चारा आता संपुष्टात येत आहे. तसेच विहरी नदी, नाले कोरडेठाक असल्याने जनावरांचा पिण्याचा पाण्याचा तसेच चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

मक्याच्या पिकात मेंढरेतीन महिन्याचे पिक होऊन देखील पाण्याविना पिकांची वाढ खुटल्याने उत्पन्न तर दुरच पंरतु झालेला खर्च निघणेही हालाखीचे झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यातच तालुक्यातील वडाळी बुद्रुक येथील शेतकरी महेंद्र कोरडे यांनी आपल्या मका पिकांमध्ये मेंढरे चरण्यास सोडली आहे.

तालुक्यातील पाऊस परस्थिती

●सर्वसाधारण पाऊस:

जुन-११५ मिमी

जुलै- ११८.५ मिमी,

ऑगस्ट-११६.७ मिमी

● यावर्षी प्रत्यक्षात पडलेला पाऊस.

*जुन* ४७.३ मिमी

*जुलै* ८९ मिमी

*ऑगस्ट* १५ मिमी

●तालुक्यातील खरीप पिके पेरणीची परिस्थिती

●एकुन खरीप क्षेत्र..६३ हजार ९७४ हेक्टर● पेरणी झालेल क्षेत्र ६३ हजार ९३४ हेक्टर

●एकुन सरासरी ९९.९४% क्षेत्रावरील पेरणी करण्यात आली होती

पाऊस रखडल्याने खुप गंभीर स्थिती आहे. पंरतु शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये. सरकार आपल्या सोबत आहे. शेतातील पिके आहे तशी असु द्या. त्या पिकांचा पंचनामा करावा लागेल. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.

-आमदार सुहास कांदे, नांदगाव

जेवढे खिशात होते तेवढे जमिनीत टाकले. हातात काहीही आलेले नाही. कर्जाचा बोजा कसा कमी होणार? आमचे जेवढे सर्वस्व तेवढे शेतीच आहे.-भावलाल सदगीर, शेतकरी सोयगाव

हेही वाचा :

The post Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली appeared first on पुढारी.