नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर दरोडेखोरांची टोळी जेरबंद

Crime,www.pudhari.news

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर दरोडेखोरांच्या टोळीस इगतपुरी पोलिसांनी जेरबंद केले आहे. टोळीतील संशयितांकडून धारदार हत्यारे, ११ मोबाइल जप्त केले आहेत. संशयितांमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

इगतपुरीचे पोलिस हवालदार एस. एस. देसले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे टाके घोटी शिवारातील ओव्हरब्रीजखाली १० एप्रिलला सापळा रचण्यात आला होता. दोन दुचाकींवर सहा संशयित आले असता पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्यापैकी एकच अल्पवयीन संशयित पकडण्यात पोलिसांना यश आले, तर इतर पाच संशयित पसार झाले होते. त्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करून १२ एप्रिलला टोळीप्रमुखासह इतर चौघांना पकडले.

संशयितांकडून ३ तलवार, चाकू, २ कोयते, १ चॉपर या हत्यारांसह जबरी चोरी केलेले ११ मोबाइल व दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अपर अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे, सहायक निरीक्षक सोपान राखोंडे, उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा :

The post नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर दरोडेखोरांची टोळी जेरबंद appeared first on पुढारी.