नाशिक : राष्ट्रवादीचे वाघ यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

ठाकरे गट www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे आमदार माणिकराव कोकाटे गटाला जबरदस्त धक्का बसला आहे. वाघ यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवा नेते उदय सांगळे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात पक्षप्रवेश केला असून सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीमुळे राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असतानाही आमदार माणिकराव कोकाटे विश्वासात घेत नाहीत. विधानसभा निवडणुकीत उपाशीपोटी कार्यकर्त्यांनी त्यांच्या विजयासाठी काम केले तरीही हा विजय केवळ आपल्या मुलीच्या कामामुळेच झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत राहावे असे त्यांना वाटत नसावे असा आरोप बाळासाहे वाघ यांनी यावेळी केला आहे.

राजाभाऊ वाजे, उदय सांगळे यांच्या सोबत लवकरच मातोश्रीवर जाणार असून या ठिकाणी उद्धव साहेबांचे आशीर्वाद घेऊ. – बाळासाहेब वाघ

हेही वाचा:

The post नाशिक : राष्ट्रवादीचे वाघ यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश appeared first on पुढारी.