नाशिक : लाचखोर सतीश खरे यांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला

सतिश खरे ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेले जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने दुसऱ्यांदा फेटाळला आहे. त्यामुळे खरे यांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

खरे यांच्या जामीन अर्जावर बुधवारी (दि.१४) न्यायालयात सुनावणी झाली. त्यांना जामीन दिल्यास पुराव्यांमध्ये फेरफार करू शकतात, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. सरकारी पक्षातर्फे ॲड. राजेंद्र बघडाणे यांनी युक्तिवाद केला. सरकारी आणि बचाव पक्षाच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपासात प्रगती न केल्याने न्यायालयाने तपास अधिकाऱ्यांवर नाराजी वर्तवली. खरे यांना लाच घेताना पकडल्यानंतर त्यांच्याकडे लाखो रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने, स्थावर मालमत्ता आढळली. तसेच लाचेची रक्कम मोठी असल्याने न्यायालयाने पहिल्यांदा जामीन फेटाळला होता.

हेही वाचा : 

The post नाशिक : लाचखोर सतीश खरे यांचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा फेटाळला appeared first on पुढारी.